शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह उदगीर येथील मोफत प्रवेश देणे सुरु

 

शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह

उदगीर येथील मोफत प्रवेश देणे सुरु

 

                                    लातूर,दि.15(जिमाका):- मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे  शासकीय वसतीगृह उदगीर जि.लातूर या वसतीगृहात  अनु. जाती, अनु. जमाती, विजाभज, वि.मा.प्र., आ.दृ.मा., अपंग, अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्ते नुसार प्रवेश, राहण्याची, भोजनाची, स्टेशनरी, सहल खर्च, गणवेश, मासिक निर्वाह भत्ता विनामुल्य दिला जातो.

                            सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे सुरु आहे. शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो गृहपाल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह उदगीर जि. लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा