मार्जिन मनी योजनेसाठी 31 डिसेंबर पूर्वी प्रस्ताव दाखल करावेत
मार्जिन मनी योजनेसाठी
31 डिसेंबर
पूर्वी प्रस्ताव
दाखल करावेत
लातूर,दि.10(जिमाका):-सामाजिक
न्याय व विशेष सहाय्यविभाग केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती
व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे
या योजनेच्या
मार्गदर्शक सूचना शासन निर्णयअन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
या योजनेकरीता
इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांचेकडे शासन
निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करुन प्रस्ताव
दिनांक 31 डिसेंबर 2021 पूर्वी सहायक
आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांचे कार्यालयात सादर करावे असे आवाहन सहायक आयुक्त एस.एन. चिकुर्ते यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment