दिव्यांगाच्या प्रगतीसाठी ऑटीझम केंद्र जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा
दिव्यांगाच्या प्रगतीसाठी ऑटीझम केंद्र
जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा
लातूर,दि.3 (जिमाका)- दिव्यांगाच्या उन्नतीसाठी लातूर जि.प. नेहमीच अग्रेसर असते. उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम ॲन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटरच्या माध्यमातून दिव्यांगाची प्रगती होत आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व सिध्दीविनायक प्रतिष्ठाण संचलित उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम ॲन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर यांच्यावतीने शुक्रवारी शासकीय वसाहत येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, माहिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक, अनुराग जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रभू जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, सिध्दीविनायक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत उटगे, बापूराव राठोड, नरेंद्र अग्रवाल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भागवत फुलारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, डॉ. नितीन
येळीकर, डॉ. जयदीप धमले, डॉ. उमेश भामरकर, जिल्हा
परिषदेचे सदस्य श्री. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील 360
दिव्यांगांनी घेतला लाभ
दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शस्त्रक्रीया शिबीरात जिल्ह्यातील 360 दिव्यांगांनी नोंदणी केली यातील जवळपास 30 दिव्यांगांना डॉक्टरांनी सर्जरीचा सल्ला देण्यात आला. या शिबीरात ऑटीझम(स्वमग्नता), बहुविकलांगता, मतिमंदता, कर्णबधिर, अस्थिव्यंग, अंध, बुध्दीअंकमापन, मुलांतील अतिचंचलता, हात पाय वाकडे असणे, मुल अभ्यासात हुशार नसणे, मुलांचे लिहिण्या-वाचण्यातील देाष,
मुले उशीरा चालणे व बोलणे, हात-पाय कमजोर असणे अशा प्रकारच्या दिव्यांगत्वार उपचार करण्यात
आले. हाडांचे विकार तज्ञ डॉ. तरल नागडा, जेनेटीक तज्ञ डॉ. गायत्री आय्यर, मेंदू विकार तज्ञ डॉ. प्रशांत उटगे,
ह्रदय विकार तज्ञ डॉ. नितीन येळीकर, कान-नाक घसा तज्ञ डॉ. शैला सोमाणी व डोळयांचे विकार तज्ञ,
डॉ. उमेश भामकर यांनी या शिबीरात दिव्यांगांची तपासणी केली.
Comments
Post a Comment