राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु

 

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे

अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु

 

लातूर,दि.30-(जिमाका) जिल्ह्यातील सर्व शासन मान्‍यता प्राप्‍त अनुदानित/ विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या अनुसूचित जाती , विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थी यांना  कळविण्‍यात येते की, सन 2021-22 या वर्षासाठी भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती (GOI) व शिक्षण शुल्‍क, परीक्षा शुल्‍क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती, व्‍यावसायिक पाठयक्रमांशी संलग्‍न असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना निर्वाह भत्‍ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्‍यासाठी महाडिबीटी हे पोर्टल  दि.14 डिसेंबर 2021 रोजी सुरु करण्‍यात आलेले आहे.

तेंव्‍हा सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांनी शिष्‍यवृत्‍ती चे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास दि.31 जानेवारी 2022 पर्यत ऑनलाईन सादर करण्‍याचे कळविण्‍यात आलेले होते. तथापि दि. 29 डिसेंबर 2021 रोजी वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनूसार पूढील प्रमाणे सुधारीत वेळापत्रक देण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2021-22 च्या नुतनीकरण अर्ज (Renewal) ऑनलाईन सादर करण्याची दिनांक 04 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मुदत. शैक्षणिक वर्ष सन 2021-22 च्या नविन अर्ज (Fresh) ऑनलाईन सादर करण्याची दिनांक 09 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मुदत.

तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती विभागाचे काम पाहणारे कर्मचारी तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना सदर बदलाची नोंद घेवून तात्‍काळ नुतनीकरण व नवीन अर्ज   MAHA-DBT पोर्टल व्‍दारे ऑनलाईन पदधतीने अर्ज सादर करावे. असे आवाहन समाज कल्‍याणचे सहायक आयुक्‍त शिवकांत चिकुर्ते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.                                                   

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु