समाज कल्‍याण विभागाच्‍या लातूर विभागातील शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

 

समाज कल्‍याण विभागाच्‍या लातूर विभागातील

 शासकीय वसतिगृहाची  प्रवेश प्रक्रिया सुरु

 

 

     लातूर,दि.6 (जिमाका)-सामाजिक न्‍याय व विशेष सहाय विभागाच्‍या अधिपत्‍याखाली मुलां/मुलींचे  शासकीय वसतिगृहामध्‍ये विद्यार्थ्‍यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्‍यांनी  त्‍यात प्रवेश घ्‍यावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर यांनी केले आहे.

         समाज कल्‍याण विभागामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती,इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांसाठी शासकीय वसतिगृह व अनुसू‍चित जाती व नवबौध्‍द निवासी शाळा चालविल्‍या जातात.त्‍यामध्‍ये विद्यार्थ्‍यांना निवास , भोजन, निर्वाह भत्‍ता व इतर शैक्षणिक सुविधा शासनामार्फत्‍ दिले जातात.  शासकीय वसतिगृह प्रवेशाकरिता अनुसूचित जाती  प्रवर्गसाठी ८० टक्‍के तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांसाठी २० टक्‍के जागा राखीव असतात.

         कविड-19 च्‍या प्रादुर्भावामुळे लातूर विभागातील वसतिगृह बहुतांशी प्रवेशित जागा रिक्‍त्‍ असून विद्यार्थ्‍यांनी या वसतिगृहात प्रवेश घ्‍यावा. आता कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्‍यामुळे शाळा  महाविद्यालये सुरु झालेली आहेत.लातूर विभागातील शासकीय वसतिगृह,अनुसूचित जाती व नवबौध्‍द निवासी शाळेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्‍यात आली असून विद्यार्थ्‍यांनी संबंधित जिल्‍हयाच्‍या शासकीय वसतिगृह व अनुसूचित जाती व नवबौध्‍द निवासी शाळा येथे प्रवेश घ्‍यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

          लातूर विभागांतर्गत लातूर जिल्‍हयामध्‍ये २५,नांदेड जिल्‍हयामध्‍ये १६,उस्‍मानाबाद जिल्‍हयामध्‍ये ११,हिंगोली जिल्‍हयामध्‍ये ८ असे एकूण ६० मुलां/मुलींची शासकीयवसतिगृहे कार्यरत आहेत. तसेच लातूर जिल्‍हयामध्‍ये ५ , नांदेड जिल्‍हयामध्‍ये ४, उस्‍मानाबाद जिल्‍हयामध्‍ये ३ व हिंगोली जिल्‍हयामध्‍ये १ असे एकूण लातूर विभागात १३ अनुसूचित जाती व नवबौध्‍द मुला/मुलींच्‍या शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत.प्रवेशासाठी संबंधीत जिल्‍हयाचे सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण कार्यालयाशी संपर्क करावा.

 

                                                                        *****

                                                                                                              

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु