कॉमन सर्व्हिस सेंटर अंतर्गत येणाऱ्या तेरा प्रकारच्या सेवा पोस्ट ऑफिसमार्फत पुरविण्यात येणार

 

कॉमन सर्व्हिस सेंटर अंतर्गत येणाऱ्या

तेरा प्रकारच्या सेवा पोस्ट ऑफिसमार्फत पुरविण्यात येणार

*लातूर,दि.1(जिमाका):-* लातूर व उस्मानाबाद जिल्हाअंतर्गत येणाऱ्या सर्व डाक कार्यालयामार्फत कोंमन सर्विस पॅन कार्ड (Pan Card) , सरकारी सेवा (Government Services), निवडणूक (Election), जीवन प्रमाण (Jeewan Praman),  प्रधानमंत्री फसल विमा योजना(Pradhan Mantri Fasal Bima Yojana), जीवन विमा प्रीमियम संकलन(Life Insuance Premium Collection), मानधन (Mandahn),  एफएसएसएआई नोंदणी (FSSAI Registration), राष्ट्रीय करिअर सेवा (National Career Service), फास्टॅग(FASTag), प्रवास सेवा ट्रेन/ हॉटेल/ विमान/ बस (Travel Service-Train/Hotel/Air/Bus), विद्यार्थी नोंदणी (Student Registration), मोटर आणि इतर (Motor & Other Insurance) विमा सेंटरमार्फत पुरवल्या जाणाऱ्या खालील सर्व सेवा पुरवल्या जातात, असे उस्मानाबाद डाक विभागचे डाकघर अधीक्षक यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु