सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  कर्मवीर दादासाहेब गायकवाड

सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात

 

लातूर, दि.29 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 ऑगस्ट 2018 शासन निर्णयान्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुर, विधवा महिला, परितक्त्या महिला, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत पिडीत लाभार्थी यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांचे राहणीमानाचा दर्जा सुधारावा. यासाठी 100 टक्के अनुदानावर 04 एकर कोरडवाहू जमीन किंवा 02 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध  करुन देण्यात येते.

या योजनेतील पात्र लाभार्थी यांना सदरील योजनेचा लाभ देणेसाठी सन 2021-2022 मधील शासकीय रेडिरेकनरच्या दराप्रमाणे जमिन खरेदी करावयाची असल्याने लातूर जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना सन 2021-2022 मधील शासकीय रेडिरेकनर दराप्रमाणे त्यांचे वैयक्तिक संयुक्त मालकीची शेतजमीन सामाजिक न्याय विभागास विक्री करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांचे कार्यालयात लेखी अर्ज सादर करावा.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु