नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत
नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत
लातूर,दि.3(जिमाका):- विभागीय सहनिबंधक,
सहकारी संस्था, लातूर यांनी महाराष्ट्र सहकारी
संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 अन्वये जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांचे कामकाजासाठी
अवसायकांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी पूढील व्यक्तिंकडून अर्ज मागविण्यात
येत असल्याचे विभागीय सहनिबंधक ,सहकारी संस्था, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त
विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग ॲडव्होकटस्, चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टट, कंपनी सेक्रेटरी,
राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी
बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका
यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी, सहकार
विभागातील सेवानिवृत्त वर्ग-1, वर्ग-2 दर्जाचे अधिकारी आणि सहकार अधिकारी प्रथम श्रेणी
व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी, महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे
अधिकारी, कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती, सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण
केले असल्याचे 05 वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक.
अर्जदार व्यक्तींनी
पूढील प्रमाणे अर्हता धारण केलेली सक्षम असावा :- या व्यक्तीवर
कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्यास
त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला
नसावा. वर्यामर्यादा 70 वर्षा पर्यंत असावी. शारीरीक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने
सक्षम असावा. प्रॅक्टीसिंग ॲडव्होकेटस व चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टट, कंपनी सेक्रेटरी
यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा 05 वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी
संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम 83 व कलम 88 च्या कार्यवाहीमध्ये जबाबदार धरलेला
नसावा (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा)
सदर व्यक्तीचा सहकार खात्याने काळ्या यादी मध्ये (Black List) मध्ये समाविष्ट केलेला
नसावा. सदर व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या
अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा.(लातूर,उस्मानाबाद, बीड व नांदेड
जिल्ह्यातील) सदर व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकेल.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक,
सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, शिवाजी
चौक लातूर ता.जि.लातूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर,उस्मानाबाद,बीड व नांदेड
यांचे कार्यालयात दिनांक 1 डिसेंबर2021 ते
14 जानेवारी 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करणेची अंतिम
मुदत दिनांक 14 जानेवारी 2022 पर्यंत राहील. प्राप्त अर्जाची छाननी दिनांक 31 जानेवारी
2022 रोजी पूर्ण करुन, दिनांक 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रारुप नामतालिका प्रसिध्द
करणे व दि.28 फेब्रुवारी 2022 हरकती मागवणे
व दि.14 मार्च 2022 रोजी हरकतीचा निर्णय करुन दि.21 मार्च 22 रोजी अंतिम नामतालिका
प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहीर सूचना
या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
***
Comments
Post a Comment