कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढ ही तिसऱ्या लाटेची चाहूल..!
कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढ ही तिसऱ्या लाटेची चाहूल..!
*लातूर जिल्हयातील नागरिकांनी दक्ष राहून मार्गदर्शक
सुचानांचे पालन करावे
*
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन
*नागरिकांनी
आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे
लातूर,दि.30-(जिमाका)
मागच्या काही दिवसात कोरोना रूग्ण संख्येत
होत असलेली वाढही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे जाणवते आहे, त्यामूळे ही तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा तिचा
कमीत कमी प्रभाव रहावा म्हणून लातूर जिल्हयातील नागरिकांनी दक्ष राहून पथ्य पाळावीत,
संबंधित सर्व मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण
व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले
आहे.
या संदर्भाने प्रसिध्दीस
दिलेल्या निवेदनात पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, दिवसेदिवस कोरोना रूग्णसंख्येत
होत असलेली वाढही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे जाणवते आहे. लातूर जिल्ह्याला तिसऱ्या
लाटेपासून स्वताला सुरंक्षित ठेवण्यासाठी येथील नागरिकांनी पथ्य पाळणे गरजेचे आहे.
या लाटेचा जिल्ह्याच्या कमीत कमी परिणाम राहण्याच्या दृष्टीने या संबंधाने जारी करण्यात
आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन होणे आवयश्यक आहे. नागरिकांनी आवश्यक असेल
तरच घराबाहेर पडावे, गर्दी करणे किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा अनिवार्यपणे
वापर करावा, गर्दी आणि प्रादूर्भाव असलेल्या ठिकाणी डबल मास्क वापरावा, शारिरीक आणि
सामाजिक अंतर पाळावे, नियमीतपणे हात स्वच्छ धुवावेत, आवश्यकतेनुसार नित्यनियमाने सॅनीटायझरचा
वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रशासनाने
खबरदारीच्या उपायांची काटेकोर अमंलबजावनी करावी, सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. लातूर
जिल्हयात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी किंवा तिचा प्रभाव कमी राहण्यासाठी
जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य, पोलीस व इतर यंत्रणांनी तातडीने पूर्व तयारी करून घ्यावी,
जिल्हयात गर्दीचे कार्यक्रम होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, मॉल्स, दुकाने, हॉटेल्स,
सिनेमागृहे यासह गर्दी होणाऱ्या ठिकाणी मार्गदर्शक सुचनांची अमंलबजावणी होते की नाही
ते पहावे, सर्दी, खोकला, ताप, घसा खवखणे अशी लक्षणे असलेल्या रूग्णांची तपासणी करावी,
तपासणीतून कोरोनाची लागण असल्याचे उघड झाल्यास त्या रूग्णाच्या संपर्कातील सर्व नागरिकांची
तपासणी करावी. त्याचबरोबर कोणत्याही संभाव्य गंभीर स्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा
सज्ज ठेवावी. रूग्णसंख्या गतीने वाढताहेत लक्षात आल्या नंतर रूग्णालये तेथील व्यवस्था
सज्ज ठेवाव्यात. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन बेडची संख्या, औषधे व ऑक्सिजनची
उपलब्धता करून ठेवण्याच्या सुचना यापूर्वीच दिल्या आहेत त्या संदर्भाने आढावा घ्यावा
अशा सुचनाही पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत.
लसीकरण मोहिमला गती दयावी
कोरोना
प्रादूर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहिम गतीमान करणे गरजेचे आहे याची जाणीव
प्रशासन व जनतेने ठेवणे गरजेचे आहे. त्यामूळे ज्यानी अद्याप लस घेतली नाही त्यांनी
ती त्वरीत घ्यावी. ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे त्यांनी तो वेळेत घ्यावा असे नमुद
करून प्रशासनाने घरोघरी जाऊन् सर्वे करावा ज्यानी लस घेतली नाही त्यांना त्याच ठिकाणी
दयावी. १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी सुरू झालेली लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवावी
असे निर्देशही पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
****
Comments
Post a Comment