ग्रामीण भागातील सु‍शिक्षीत बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री प्रशिक्षण

 

      ग्रामीण भागातील सु‍शिक्षीत बेरोजगार यांना

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री प्रशिक्षण

 

 लातूर,दि.27 (जिमाका):-  केंद्रशासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील सु‍शिक्षीत बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री (Multipurpose Artificial Insemination Worker In Rural India ( MAITRI ) म्हणून प्रशिक्षण दयावयाचे आहे. व प्रशिक्षीत व्यक्तिची कृत्रिम रेतन व अनुषंगीक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे. जेणेकरुन राज्यातील गायी - म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच त्यायोगे दुग्ध उत्पादनात वाढ होवुन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.  

या प्रशिक्षण कार्यक्रम हा 3 महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना क्लासरुम ट्रेनींग व दोन महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंगचा समावेश राहील. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैद्यकिय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल व प्रॅक्टीकल ट्रेनींग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या ठिकाणी  घेण्यात येईल.

हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे वय 18 ते 35 वर्ष असावे.अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध्‍ होईल.

लातूर जिल्ह्याकरीता सर्वसाधारण प्रवर्गातुन 07, अनुसुचित जाती प्रवर्गातुन 02 या प्रमाणे एकूण 09 उमेदवारांची सदर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. या योजनेंतर्गत इच्छुक उमेदवारांनी दि. 25 डिसेंबर 2021 ते दि.5 जानेवारी 2022 पर्यंत आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावे असे आवाहन  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तचे डॉ. नानासाहेब कदम व जिल्हा परीषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  डॉ. राजकुमार पडिले लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु