कृषि पर्यटन संदर्भात 14 डिसेंबर राजी कार्यशाळाचे आयोजन
कृषि
पर्यटन संदर्भात 14 डिसेंबर
राजी
कार्यशाळाचे आयोजन
लातूर,दि.9(जिमाका):- राज्यातील शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय उपलब्ध करुन देणे आणि शहरी
पर्यटकांना शांत निसर्ग संपन्न ठिकाणी राहुन पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी एक सुनियोजीत व्यवस्था
निर्माण करुन पर्यटन विकास साध्य करण्यासाठी मंञी मंडळाच्या झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार
राज्यात “कृषि पर्यटन धोरण” संदर्भात दि.14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता नविन जिल्हाधिकारी
कार्यालय, डी.पी.डी.सी सभागृह, लातूर येथे
कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.
राज्यातील सुमारे
55 ते 60 टक्के लोक प्रत्यक्ष शेतीवर अवलंबुन आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या
विकासाठी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग,
मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषि सलग्न विषयाचा एकञित विचार केल्यास ग्रामीण
भागामध्ये कृषि पर्यटनाला निश्चितपणे चलना मिळु शकते.
या कार्यशाळेमध्ये औरंगाबाद येथील कृषि पर्यंटन अधिकारी,
श्री. हारकर हे या विषयी मार्गदर्शन करणार
असून लातूर जिल्हयातील जे इच्छुक शेतकरी आहेत त्यांनी त्यादिवशीच्या कार्यशाळेचा आवश्य
लाभ घ्यावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी आवाहन केले आहे.
****
Comments
Post a Comment