महाऊर्जाच्या ऊर्जा संवर्धन चित्ररथाचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
महाऊर्जाच्या ऊर्जा संवर्धन
चित्ररथाचा
हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
लातूर,दि.17(जिमाका):-महाऊर्जातर्फे 14 डिसेंबर रोजी हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन
दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 14 ते 20 डिसेंबर या कालावधीत महाऊर्जातर्फे जनसामन्यात
ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक
देविदास कुलकर्णी यांच्या हस्ते गुरुवार (दि 16) चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राज्यस्तरीय
ऊर्जा संरक्षण पुरस्कृत संस्था दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश
दरगड, डॉ. ललित ठाकरे, डॉ. प्रा. कोमल घोमारे आणि त्यांचे सहकारी व राज्यस्तरीय ऊर्जा
संरक्षण पुरस्कृत तसेच लेखा परिक्षक केदार खमितकर व किरण खमितकर इतर मान्यवर उपस्थित
होते. या चित्ररथाद्वारे राज्यातील ऊर्जा संवर्धनाविषयीची माहिती विविध शैक्षणिक संस्था,
शासकीय / निमशासकीय कार्यालये, उद्योग यांना भेटी देवून LED पटलावर चित्रफितीच्या माध्यमातून
प्रसारित करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे या चित्ररथावर लावलेल्या पोस्टर्सद्वारे सर्वसामान्यांना
ऊर्जा बचतींचा संदेश देण्यात येणार आहे. तसेच ऊर्जा बचतीचे महत्व पटवून दिले जाणार
आहे. ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या अनुषंगाने विभागीय कार्यालयामार्फत लातूर, उस्मानाबाद,
बीड व नांदेड येथील विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा
तसेच ऊर्जा क्लबची स्थापना आदीचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे जनमाणसात व विद्यार्थ्यांमध्ये
ऊर्जा संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण होवून प्रदूषण विरहीत व स्वच्छ भारत निर्माण होण्यास
मदत होणार आहे.
या कार्यक्रमावेळी
महाऊर्जा विभागीय कार्यालयाचे प्रेरणा नलावडे, प्रकल्प अधिकारी पल्लवी शेळके, पुजा
धुमाळ, अंजली जाधव, सुप्रिया आवडोबा, किरण जोशी, शुभम पिसाळ, अश्विन वाडीभस्मे, प्रणय
बावणे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment