विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याकडे 20 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावेत

 

विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी

वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याकडे 20 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावेत

 

             लातूर,दि.16(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत कार्यरत मागासवर्गीय मुलां- मुलींचे शासकीय वसतिगृहाकरीता शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षाकरीता रिक्त असलेल्या जागेवर इयत्ता आठवी, इयत्ता अकरावी, तसेच बारावी वी नंतर पदवी / पदवीका / पदवीव्युत्तर प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी लातूर या ठीकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणेसाठी दि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रवेशासाठी अर्ज शासकिय वसतिगृहाचे गृहपाल यांचेकडे उपलब्ध आहेत. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज भरुन संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांच्याकडे दि.20 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन  गृहपाल, मुलांचे शासकिय वसतिगृह (जूने) लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                              ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा