राष्ट्रीय लोकअदालतीमधील उत्स्फुर्त प्रतिसादाने 1 हजार 309 प्रकरणे तडजोडीने निकाली

 

राष्ट्रीय लोकअदालतीमधील उत्स्फुर्त प्रतिसादाने

1 हजार 309 प्रकरणे तडजोडीने निकाली

 

       लातूर,दि.13(जिमाका):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकआदलतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,न्या. सुरेखा कोसमकर, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. जिल्हयातील लोकअदालतीमध्ये 1 हजार 309 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले असल्याचे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

        या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात, कौटुंबिक, भुसंपादन व तडजोड युक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये सर्व एस.बी.आय. बॅंक, भारत संचार निगम लिमिटेड, टी.व्ही.एस क्रेडीट सर्व्हिस कंपनी, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं, बॅक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बॅक ऑफ बडोदा, युको बॅक, आय.सी.आय.सी.आय बॅक, यु.बी.आय., एम.जी. बॅंक, बॅंक आफ बडोदा, बॅक आफ महाराष्ट्र, पंजाब नॅशलन बॅंक, आय.डी.बी.आय.बॅक, कॅनरा बॅंक, दिनदयाल नागरी पतसंस्था, महिंद्रा फायनान्स कं., महिंद्रा ट्रान्सपोर्ट फायनान्स कं. व ई -चलन रहदारी वादपुर्व प्रकरणे यांची वादपुर्व प्रकरणे सर्व शाखा मध्यस्थी केंद्रामधील वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली.

                    या आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये लातूर जिल्हयात एकुण 1 हजार 309 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती एस.डी. अवसेकर, यांनी दिली आहे. या लोकअदालतीला पक्षकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्शभुमीवर सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीचे पॅनेल जिल्हा न्यायालयातील तीन इमारतीत, जिल्हा विधीज्ञ संघ, लातूर तसेच न्यायालयाच्या परिसर येथे विभागण्यात आले होते.

        या लोक अदालतमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या. सुरेखा कोसमकर,  व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती एस. डी. अवसेकर, सर्व न्यायाधीश तसेच बार कॉन्सील महाराष्ट्र आणि गोवा आण्णाराव जी. पाटील, सदस्य, व लातूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष आर. डी. काळे, आदिजण उपस्थित होते.

           लोकअदालतीसाठी जिल्हयातून एकूण (30) पॅनलद्वारे कामकाज पार पाडण्यात आले. यात लातूर तालुक्यातील पॅनलवर न्या. डी. पी. रागीट, न्या. जे. एम. दळवी, न्या. मोहम्मद ए.वाय. एच., न्या. जी.आर ढेपे, असे जिल्हा न्यायाधीश, न्या. के.एम. कायंगुडे, न्या. एस. एन. भोसले, न्या. व्ही. बी. गुळवे-पाटील, न्या. ए. ए. शेख, न्या. ए. एस. मुंडे, असे दिवाणी न्यायाधीश व स्तर, न्या. श्रीमती ए. ए. पुंड, न्या. पी. डी. कोळेकर, न्या. व्ही. एस. शिंदे, न्या. श्रीमती ए.एम. शिंदे, न्या. श्रीमती एस.सी. निर्मले, न्या. श्रीमती यु. ए. भोसले, असे दिवाणी न्यायाधीश, क.स्तर यांनी पॅनल प्रमुख म्हणुन कामकाज पाहिले.

         तसेच या लोकअदालतमध्ये पॅनलवर अॅड. एन.पी.गायकवाड, अॅड. जे.आर. यावलकर, अॅड. एस.ए. शेख, अॅड. एस.पी. रणदिवे, अॅड. माधुरी चौधरी, अॅड. ए.बी. कलशेट्टी, अॅड. एस.व्ही. सलगरे, अॅड. यु.पी. नाईक, अॅड. सरिता कांबळे, अॅड. सी.बी. शिंदे, अॅड. सी.एस. अकाते, अॅड. योगेष शिंदे, अॅड. रेहाना तांबोळी, अॅड. सी.डी. सुर्यवंशी, अॅड. प्रतिभा कुलकर्णी, अॅड. के.आर. शिंदे, अॅड. बी.व्ही. कांबळे, अॅड. कल्पना भुरे, अॅड. यु.एन. राउत, अॅड. रमेश कुचमे, अॅड. हर्षला जोशी यांनी पॅनल पंच म्हणुन कामकाज पाहिले.

           लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती एस.डी. अवसेकर, सर्व न्यायाधीश, सदस्य बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा अॅड. आण्णाराव जी. पाटील, जिल्हा सरकारी वकिल, लातूर अॅड. एस.व्ही. देशपांडे, जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष अॅड.आर.डी.काळे, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 



                                                       ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा