जिल्ह्यात 23 आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आगमन पैकी 10 निगेटिव्ह, 8 जणांचे अहवाल प्रतिक्षेत

 

जिल्ह्यात 23 आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आगमन

पैकी 10 निगेटिव्ह, 8 जणांचे अहवाल प्रतिक्षेत

 

लातूर,दि.6 (जिमाका)- जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या व्यक्तींची प्रवासी संख्या 23 असून यामध्ये जिल्ह्यात उदगीर येथील -4, औसा-4, निलंगा-1 व लातूर महानगरपालिका क्षेत्रात-14 प्रवाशांचा समावेश असल्याचे जिल्हा सर्वेक्षण कक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

या प्रवासी संख्येमधून 21 प्रवाशी ट्रेस झाले असून यामध्ये उदगीर-4, औसा-2, निलंगा-1 व मनपा लातूर -14 असे आहेत.  ट्रेस न झालेले -2 प्रवाशी औसाचे आहेत. हे प्रवाशी लातूर जिल्ह्यात आल्यानंतर RTPCR चाचणी केलेल्या प्रवाशांची संख्या 18 असून यामध्ये -10 निगेटिव्ह व 8- प्रतिक्षेत रिपोर्ट आहेत. हे सर्व अमेरिका, ब्रिटन, युएई, ऑस्ट्रीया, दुबई व अबुधाबी येथून आलेले आहेत.

या मध्ये दोन प्रवाशांचा मुळ पत्ता अर्धवट आहे. पीन कोड नुसार पत्ता औसा घेण्यात आला आहे. ट्रेस आलेल्या 21 प्रवाशांपैकी 2- प्रवासी सोलापूर येथील असून एक प्रवासी पुणे येथील आहे.  असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख यांनी कळविले आहे.

                                                         

 

                                              ****

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु