अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांसाठी पुरवणी प्रवेश वेळापत्रक
अर्ज सादर करु
न शकलेल्या उमेदवारांसाठी
पुरवणी प्रवेश वेळापत्रक
लातूर,दि.13(जिमाका):- शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेतील सत्र ऑगस्ट-2021 ची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने
चालू आहे. प्रशिक्षण संचालनालय, नवी दिल्ली यांनी तिसऱ्या पाळीतील (Third Shift) तुकडयांना प्रवेशाची परवानगी दिल्याने व प्रवेशाची
अंतिम तारीख दि. 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविली असल्याने विहित मुदतील अर्ज सादर
करु न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संघी उपलब्ध् करुन देण्यासाठी पूढील प्रमाणे
पुरवणी प्रवेश वेळापत्रक जाहीर केले आहे असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक
पूढील प्रमाणे आहे. प्रवेश प्रक्रियेचा तपशील नव्याने ऑन लाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश
अर्ज निश्चित करणे – विहित मुदतील प्रवेश अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन
फेरीत संधी उपलब्ध् करुन देण्यासाठी ऑन लाईन पध्दतीने नव्याने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात
दुरुस्ती Edit करणे व अर्ज शुल्क जमा करणे प्रारंभ दिनांक 11 डिसेंबर 2021 स. 11.00 वाजेपासून
ते अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2021 सायं. 5.00 वाजेपर्यंत.
या पूर्वी व नव्याने अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांची समुपदेशन
फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे व उमेदवारांना SMS व्दारे कळविणे. 16 डिसेंबर 2021 दुपारी 3.00 वाजता.
नव्याने अर्ज केलेल्या उमेदवारांनी दि. 17
डिसेंबर 2021 पासुन पूढील प्रमाणे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संबंधित संस्थेत
उपस्थित रहावे.
संस्थास्तरीय समुपदेशन फेरी- प्रवेशोच्छुक व नोंदणीकृत उमेदवारांनी
संबंधित औ.प्र. संस्थेत सकाळी 8.00 वाजेपासून ते 11.00 वाजेपर्यंत व्यक्तीश:हजर राहुन
समुपदेशन फेरीकरिता दररोज स्वतंत्ररित्या हजेरी नोंदवावी. संस्थेत त्या दिनांकास सकाळी
11.00 वाजेपर्यंत उपस्थित असलेल्या सर्व नोंदणीकृत उमेदवारांची हजेरी संबंधित संस्थेव्दारे
दुपारी 1.00 वाजेपर्यंत संकेतस्थळावर नोंदविणे. 11 डिसेंबर 2021 स.11.00 वाजेपासून
ते 31 डसेंबर 2021 सर्व रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळता.
संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी हजेरी नोंदविलेल्या उमेदवारांमधून
त्याच दिवशी संबंधित संस्थास्तरावर दुपारी 1.00 वाजता गुणवत्ता यादी तयार करुन प्रकाशित
करणे. संस्थास्तरावर तयार केलेल्या गुणवत्ता यादी नुसार उमेदवारांना समुपदेशनाकरिता
बोलाविण्यात येईल. प्रवेशाकरीता उपलब्ध् जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवाराची अर्हता
या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल.
या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्र
पडताळणीनंतर संबंधित औ.प्र.संस्थेत त्याच दिवशी प्रवेश निश्चितीची प्रत्यक्ष कार्यवाही
करावी. उमेदवारांनी त्याच दिवशी प्रवेश निश्चित
न केल्यास सदर जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजुन प्रवेशासाठी खुली करण्यात येईल असे ही
प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.
****
Comments
Post a Comment