सायकलिस्ट नरपत सिंह राजपुरोहित यांचा जम्मू-काश्मिर ते 22 राज्यातून लातूरपर्यंत प्रवास

 

सायकलिस्ट नरपत सिंह राजपुरोहित यांचा

जम्मू-काश्मिर ते 22 राज्यातून लातूरपर्यंत प्रवास

       


लातूर दि. 11 ( जिमाका ):- सायकलिस्ट नरपत सिंह राजपुरोहित हे पर्यावरणाचा संदेश घेवून शुक्रवारी सायकलने लातूर येथे आले. येथे आर.टी.सी. सी आर पी एफ , महादेव नगर, लातूर येथील पोलीस उपमहानिरीक्षक संजीव कुमार, प्राचार्य तथा कमाण्डेन्ट यांनी स्वागत करुन अभिनंदन केले. सायक्लिस्ट नरपत सिंह राजपुरोहित यांच्या हस्ते सी आर पी एफ च्या प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली.

        


श्री. राजपुरोहित म्हणाले की, दिनांक 27 जानेवारी 2019 पासून सुरुवात करुन जम्मू - काश्मिर पासून ते 22 राज्यातून 4 हजार 800 किलोमीटर सायकल प्रवास करुन महाराष्ट्रातील लातूर येथे मी पोहोचलो. या प्रवासादरम्यान पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीवांची संरक्षण करण्याबाबत  वृक्ष भेट देवून जनजागृती करता येवू शकते. तसेच यावेळी आर.टी.सी., सी आर पी एफ लातूर येथील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

0000

 

 


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु