उदगीर येथील शासकीय मागासवर्गीय वसतीगृह (मुलांचे) मोफत प्रवेश देणे सुरु
उदगीर येथील
शासकीय मागासवर्गीय वसतीगृह (मुलांचे)
मोफत प्रवेश
देणे सुरु
लातूर,दि.15(जिमाका):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह उदगीर जि.लातूर या वसतीगृहात
अनु. जाती, अनु. जमाती, विजाभज, वि.मा.प्र., आ.दृ.मा., अपंग, अनाथ विद्यार्थ्यांना
गुणवत्ते नुसार प्रवेश, राहण्याची, भोजनाची, स्टेशनरी, सहल खर्च, गणवेश, मासिक निर्वाह
भत्ता विनामुल्य दिला जातो.
सन
2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
देणे सुरु आहे. शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो असे गृहपाल डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह उदगीर जि. लातूर यांनी प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment