शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत प्रवेश अर्ज उपलब्ध्

 

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी

15 डिसेंबरपर्यंत प्रवेश अर्ज उपलब्ध्

 

             लातूर,दि.9(जिमाका):- शासकीय वसतिगृहामध्ये सन 2021-22 ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून वसतिगृह प्रवेशासाठी प्रवेश अर्ज दि. 15 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध्‍ असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये मुलांची 13 व मुलींची 12 असे एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सदर वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे माहे मार्च 2020 पासुन बंद करण्यात आलेली होती. सदर शासकीय वसतिगृहे कोविड-19 बाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सुरु करण्यात आलेली आहेत.

            शासकीय वसतिगृहामध्ये  प्रवेश घेण्यासाठी इ. 8 वी मध्ये प्रवेशित इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर / तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृह गृहपाल व इ. 11 वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी जिल्हयातील सर्व वसतिगृह गृहप्रमुख / गृहपाल तसेच पदवी / पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी त्यांचे महाविद्यालयाच्या शहराचे ठिकाणी कार्यान्वीत शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख / गृहपाल यांचेशी संपर्क करुन दि. 15 डिसेंबर 2021 पर्यंत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश अर्ज भरुन सादर करावे असे  आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याणचे एस.एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

 

                                                           ****

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु