विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये “जागतिक दिव्यांग दिन” साजरा

 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये

जागतिक दिव्यांग दिन साजरा

 

            लातूर,दि.3 (जिमाका) :-  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातुर येथे आज  जागतिक दिव्यांग दिन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

            यावेळी दिव्यांग कर्मचाऱ्यांचा अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. अधिष्ठाता  डॉ. सुधीर देशमुख यांनी दिव्यांग व्यक्तींनी आपली कार्यक्षमता ओळखून अधिक जोमाने कामकाज पार पाडावे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांकडे जुने दिव्यांग प्रमाणपत्र आहेत, अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आपले प्रमाणपत्र नुतणीकरण करुन घेवून युनिक आयडी कार्ड असेलेले दिव्यांग प्रमाणपत्र काढुन घेण्यात यावे असे सांगितले. दिव्यांग कर्मचाऱ्यांना येणाऱ्या संस्थास्तरावरील अडचणी त्वरीत सोडविण्यात येतील असे आश्वासित केले. तसेच जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

            या कार्यक्रमास वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ. लक्ष्मण सरकुंडे,  अधिसेविका, श्रीमती अमृता पोहरे, वरीष्ठ लिपीक श्रीधर उरगुंडे, श्री. हरीष पिंपळकर व दिव्यांग कर्मचारी हे उपस्थित होते.

 



 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु