महाऊर्जा विभागीय कार्यालय, लातूर मार्फत राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्याचे अवाहन

 

महाऊर्जा विभागीय कार्यालय, लातूर मार्फत

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्याचे अवाहन

 

लातूर,दि.17(जिमाका):-पारंपारिक ऊर्जेचे संवर्धन करणे व अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे या बाबींना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह दि. 14 ते 20 डिसेंबर या दरम्यान दरवर्षी साजरा करण्यात येतो. प्रति वर्षाप्रमाणे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्य लातूर विभागातील नागरिकांमध्ये भविष्यात निर्माण होऊ घातलेल्या ऊर्जा संकटाबाबत जागृती करणे व अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरा विषयी प्रबोधन करण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्याचे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालयाचे विभागीय महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी यांनी केले आहे.

            भारत जगभरातील हरित वायु उत्सर्जन करण्याऱ्या देशांपैकी प्रमुख देश गणला जातो. भारताने पॅरिस वैश्विक हवामान बदल करारनामा सन 2015 मध्ये आपल्या सक्रीय सहभागात अनुमती दर्शविली असून या अनुषंगाने आपला देश 17 शाश्वत विकास ध्येय राबवित आहेत. नवीन व नवीकरणीय ऊर्जेचे तसेच उर्जा बचतीचे महत्व दिवसेंदिवस वाढत असून ही काळाची गरज आहे. जवळपास 63 टक्के पेक्षा जास्त ऊर्जा निर्मिती ही औष्णिक ऊर्जा निमिर्ती पध्दतीने केली जाते. 

            पारंपारिक उर्जा निर्मिर्तीचे स्त्रोत सीमित असल्याने सद्यस्थितीत नित्यनूतनशील उर्जेशिवाय पर्याय नसून ही प्रदूषण विरहीत आहे. ऊर्जा संवर्धन करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह  साजरा करण्याचे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालयामार्फत देण्यात आले आहे. याकरिता नागरिक/उद्योजक/व्यावसायिक यांनी आपल्या दैनंदिन वापरात सौर उर्जेचा जसे सौर उष्णजल संयंत्र (सोलार वॉटर हिटर) , सौर संयंत्र (Grid Connected Roof Top), कुसूम योजने अंतर्गत शेतीसाठी सौर पंप, 5 स्टार लेबल असलेली विजेवर चालणारी घरगुती उपकरणे (फॅन,फ्रीज,एसी,बल्ब,ट्युब इत्यादी), सौर पथदिवे यांचा वापर करावा. तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालयाने आपल्या संस्थेचे ऊर्जा परिक्षण (Energy Audit) करून घेणे आवश्यक आहे त्यासाठी महाऊर्जामार्फत आर्थिक अनुदान दिले जाते.

तरी याचा वापर करून प्रदुषण विरहीत भारत पुढील पिढीला देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे आवाहन  महाऊर्जा विभागीय कार्यालयाचे विभागीय महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु