सुझूकी मोटार आणि एल अँड टी करीता भरती मेळावा
सुझूकी मोटार
आणि एल अँड टी
करीता भरती मेळावा
लातूर दि.22(जिमाका):- औघोगिक प्रशिक्षण संस्था
शिवाजी चौक, लातूर येथे मे.SUZUKI MOTORS प्रा.लि.गुजरात या कंपनीचा आय.टी.आय. उत्तीर्ण
नमुद व्यवसायाकरीता भरती मेळावा आयोजित केला
आहे.
( FITTER,DIESEL MECH, MOTOR MECH, TURNER, MACHINIST, WELDER, ELECTRICIAN, TOOL
&DIE MAKER,PPO, COE (AUTOMOBILE), TRACTOR
MACH, PAINTER,(G)) आवश्यक पात्रता,वय 18 ते 23 वर्ष दहावी मार्क 50 टक्के आयटीआय मार्क 60 टक्के निवड
झालेल्या उमेदवारांना कंपनीकडून रु 20 हजार 100/- पगार व इतर सोयी दिल्या जाणार आहेत.
तसेच दिनांक 25 डिसेंबर
2021 रोजी सकाळी 10.00 वाजता आवश्यक सर्व कागदपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती, पासपोर्ट
आकाराचे दोन फोटो व इतर मुळ तसेच झेरॉक्स सर्व कागदपत्रासह हजर रहावे, असे आवाहन अशंकालीन
प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र दारा औघोगिक प्रशिक्षण संस्था
अंशकालीन प्राचार्य यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
एल अँड टी
चा भरती मेळावा
औघोगिक प्रशिक्षण संस्था
शिवाजी चौक, लातूर येथे L&T Construction Skills Training Institute Panvel
Mumbay या कंपनीचा दहावी पास या कंपनीचा आय.टी.आय.
उत्तीर्ण नमुद व्यवसाया करीता दि. 29 डिसेंबर 2021 रोजी CARPENTRY, MASONRY (Building Construction)
ELECTRICIAN , WELDER या व्यवसायातील दहावी / आयटीआय उत्तीर्ण वय वर्ष 18 पुर्ण असलेल्या
प्रशिक्षणार्थ्यांचा भरती मेळावा आयोजित केला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीकडून
रु. 15 हजार पगार व इतर सोयी दिल्या जाणार
आहेत.
दिनांक 29 डिसेंबर
2021 रोजी सकाळी 10.00 वाजता आवश्यक सर्व कागदपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती, पासपोर्ट
आकाराचे दोन फोटो व इतर मुळ तसेच झेरॉक्स सर्व कागदपत्रासह हजर रहावे. असे आवाहन अशंकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण
तथा अनुषंगिक सुचना केंद्र दारा औघोगिक प्रशिक्षण संस्था अशंकालीन प्राचार्य यांनी
एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
***
Comments
Post a Comment