मराठा आरक्षण आंदोलन - मृत्यूमुखी झालेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत
मराठा आरक्षण आंदोलन - मृत्यूमुखी झालेल्यांच्या वारसांना
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत
लातूर,दि.30-(जिमाका) तहसील कार्यालय लातूर येथे तालूका क्रिडा समिती (मुरुड
) समितीचे अध्यक्ष व आमदार लातूर ग्रामीणचे
धीरज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त अंतिम करण्यात
आले.
यावेळी मराठा
आरक्षण आंदोलनात दिनांक 08 ऑगस्ट 2018 रोजी मृत्यूमूखी पडलेले मौ. माटेफळ येथील कै.
रमेश ज्ञानोबा पाटील यांचे वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणे बाबतचा प्रस्ताव
या कार्यालयाकडून शासनास सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्ताव शासनाने मंजूरी देवून मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेले
कै. रमेश ज्ञानोबा पाटील यांचे वारस उषाबाई रमेश पाटील यांना दहा लाख रुपये मदत मुख्यमंत्री
सहायता निधीतून मंजूर केली होती. सदर मदत निधीचा धनादेश आज रोजी लातूर ग्रामीणचे आमदार
धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते उषाबाई रमेश पाटील यांना वाटप करण्यात आली.
यावेळी तहसीलदार
स्वप्निल पवार, निवासी नायब तहसीलदार राजेश जाधव, तालूका क्रिडा अधिकारी, लातूर जिल्हा
बँकेचे उपाध्यक्ष ॲङ प्रमोद जाधव, टेंवंटीवन साखर च उपाध्यक्ष विजय देशमुख, संजय गांधी
निराधार योजना समिती तालूका लातूर, लातूर ग्रामीणचे चेअरमन प्रविण पाटील, विलास साखर
चे उपाध्यक्ष रविंद्र काळे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, सुभाष घोडके, माधव गंभीरे
तसेच अव्वल कारकून अविनाश साठे, मंडळ अधिकारी मुरुड अनिल सुर्यवंशी व मयताचे वारस अजय
रमेश पाटील हे उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment