गणेशोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी Bappa.org उपक्रम
लातूर प्रतिनिधी : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिला आहे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला जागतिक स्तरावर नेणे तसेच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला युनेस्कोचा वारसा दर्जा व यासंदर्भातील अन्य जागतिक मानांकने प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचे केवळ सांस्कृतिक वैभव नसून तो अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक तसेच उद्यमशीलतेला चालना देणारी व्यापक लोकचळवळ आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे जागतिक संस्थांसाठी दस्तऐवजीकरण करणे व या उत्सवाशी संबंधित परंपरा, कला, चालीरीती व सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरांमधील गणेशोत्सवाशी संबंधित घरगुती व सार्वजनिक परंपरा, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, हस्तकला, चालीरीती, कला सादरीकरण, खाद्यपरंपरा,आठवणी,छायाचित्रे व व्हिडिओ नागरिकांना WhatsApp च्या माध्यमातून नोंदविता व अपलोड करता येणार आहेत. जनतेच्या सहभागातून तयार होणारा हा महाराष्ट्राच्या गणेशपरंपरेचा अधिकृत व कायमस्वरूपी सांस्कृतिक दस्तऐवज ठरणार आहे.
राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. Bappa.org नोंदणी करणा-या नागरिकांना शासनाचे अधिकृत 'Digital Cultural Preserver Certificate' देण्यात येणार आहे.
लातूर शहर महानगरालिकेच्या वतीने आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी Bappa.org वेबसाईटवर नोंदणी करुन नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे अवाहन केले आहे.

Comments
Post a Comment