माजी सैनिक मुलींचे वसतीगृहात आज शौर्य दिन

माजी सैनिक मुलींचे वसतीगृहात आज शौर्य दिन लातूर, दि. 28 : भारतीय सैन्यदलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत सर्जिकल स्ट्राइकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक पोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी प्रतिवर्षी 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा केला जातो. त्यानुसार 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील माजी सैनिक मुलींचे वसतिगृह येथे शौर्य दिन साजरा करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्यपदक धारक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, शासकीय व विविध अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तसेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत