आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूर येथे १ ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूर येथे १ ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन लातूर, दि. २८ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी १ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय आणि जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:३० ते ८:३० या वेळेत लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ पारित करून तो १ मार्च २००९ पासून लागू केला आहे. या अधिनियमाच्या अनुषंगाने राज्य शासनाने २३ जून २०१० अन्वये नियम २०१० पारित केलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिरास बहुसंख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त विलास केंद्रे व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ लातूर शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत