लातूर जिल्ह्यात आज भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान अंतर्गत ११ ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन
लातूर जिल्ह्यात आज भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान
अंतर्गत ११ ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन
लातूर, दि. २८ : इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध ११ ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. भटके विमुक्त प्रवर्गातील बांधवांना सर्वसाधारण रहिवास ठिकाण निश्चित नसल्याने त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून, त्यांच्या हक्काची ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ थेट वस्त्यांवर जावून उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे.
लातूर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे, तुळजाभवानी नगर, भोईवस्ती, लातूर या ठिकाणी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रेणापूर तालुक्यातील मोहननगर येथे सकाळी १० ते दुपारी २ वा. दरम्यान, तर कैकाडी वस्ती येथे दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिबीर होईल. औसा तालुक्यात नागरसोगा येथील चंदनवाले वस्ती येथे आणि सत्तरधारवाडी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
निलंगा तालुक्यात औराद शहाजानी आणि अंबुलगा बु. येथे २९ सप्टेंबर रोजी शिबीर होणार आहे. तसेच उदगीर तालुक्यातील देवर्जन, जळकोट तालुक्यातील डोंगरगाव सुल्लाळी लमाण तांडा येथेही विशेष शिबीर होणार आहे. चाकूर तालुकात्यील नळेगाव, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ बुद्धविहार सभामंडप येथेही २९ सप्टेंबर रोजी विशेष शिबीर होणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment