सैनिकांचे पेन्शन आणि ‘स्पर्श’ प्रणालीबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी बेळगावात मेळावा

सैनिकांचे पेन्शन आणि ‘स्पर्श’ प्रणालीबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी बेळगावात मेळावा लातूर, दि. २८ : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता, वीरपिता, विधवा व तसेच सर्व वयोवृद्ध सैनिकांच्या पेन्शन व ‘स्पर्श’ प्रणाली संदर्भातील शंका आणि अडचणींचे निरसन करण्यासाठी रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६ रोजी बेळगाव येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर, बेळगावच्या स्टेडियमवर सकाळी ७ वाजल्यापासून हा मेळावा होणार आहे. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन व ‘स्पर्श’ प्रणालीच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात पेन्शन व ‘स्पर्श’ संबंधी असलेल्या शंका व अडचणीचे निरसन करण्याबरोबच माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या अन्य शासकीय योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. संबंधीत योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने आवश्यक मार्गदर्शनादेखील यावेळी करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता, वीरपिता, तसेच सर्व वयोवृद्ध सैनिकांनी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर, बेळगाव यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,लातूर यांच्यामार्फत केले आहे. या मेळाव्यात अधिक माहीतीसाठी मराठा लाईट इन्फंट्रीरेजिमेंटल सेंटर, बेळगाव यांच्या ८३१७३५०५८४ या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी कळविले केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत