किल्लारी भूकंपातील मृतांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन
किल्लारी भूकंपातील मृतांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन
लातूर, दि. ३० : औसा तालुक्यातील किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. तसेच पोलीस दलामार्फत हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी यावेळी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, औसाचे पोलीस उपाधीक्षक कुमार चौधरी, तहसीलदार घनश्याम अडसूळ, किल्लारीचे अपर तहसीलदार रामेश्वर स्वामी, किल्लारीचे सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
***
Comments
Post a Comment