आदर्श आचारसंहितेमुळे ५ ऑक्टोबरचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित
आदर्श आचारसंहितेमुळे ५ ऑक्टोबरचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित
लातूर, दि. ३० (जिमाका) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, सध्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या आचारसंहितेच्या नियमांची व तरतुदींची अंमलबजावणी सुरू असल्यामुळे येत्या सोमवारी, म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणारा जिल्हा लोकशाही दिन स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
****
Comments
Post a Comment